7 Apr · admin · No Comments

शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्मितिन यांचे ‘स्मार्टस्टेप्स’

आजकाल शिक्षणक्षेत्रात होणारे बाजारीकरण पाहता, आपल्या पाल्याला माफक दरात दर्जेदार शिक्षण देणे हे प्रत्येक पालकासमोरील आव्हान आहे. आपल्या पाल्याने सर्वात चांगल्या आणि महागड्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेणे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. अनेक पालकांना आर्थिकदृष्ट्या ते शक्य नसते. तरीही वेळप्रसंगी ते आपल्या पोटाला चिमटा काढून पाल्याला महागड्या संस्थांमध्ये शिक्षणासाठी पाठवतात. अनेक पालकांचा तर तो स्टेटसचा प्रश्न असतो. पालकांच्या या प्रश्नावर स्मितीन ब्रीद यांनी उत्तर शोधताना ‘स्मार्ट स्टेप्स प्रीस्कूल’ची स्थापना केली आहे. अनेक मध्यमवर्गीय पालकांना समाजातील आपल्या स्टेटस पायी पाल्याने सरकारी शाळेत शिक्षण घेऊ नये, असे वाटत असते. तसेच मोठ्या शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तेथे होणाऱ्या खर्चामुळे आर्थिक जुळवाजूळव करताना अनेकदा त्यांच्या नाकी नऊ येतं.

READ MORE